कोरोना मुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले एक खरी कहाणी
मला अन् मझ्या ४ महिन्याचा बाळाला भर आयुष्याच्या उन्हात सोडून तो निघून गेला होता, इतका लांब की तो आता कधीच वापस नव्हता येणार..हा विचारच मला अस्वस्थ करत होता...मला आज जगणं म्हणजे काय असत ते उमजलं होत, मला क्षण भर वाटल व्हत की माझ्या आयुष्याच नंदन वण झाल, मला पदर भरून सगळ भेटल व्हत..पण नशिबात नव्हत..सगळ काई एका सपना सारखं वाटत व्हत एका चिमणी चा खोपा वादळात २ मिनिटात जसा उडून जातो तस मझ बी झाल होत.. ( हातात लहान बाळा ला घेऊन त्याच्या गाला वरून हात फिरवत ) "बाळा काय घेऊन आला हायीस र तुझ्या नशिबात तुला बापाचं प्रेम बी नाही मिळालं..." ( तिच्या डोळ्या तून पाण्याचे थेंब बाळाच्या अंगावर पडत होते ) तो निष्पाप जीव टक मक पाहत होता तेला कोण माय अन् कोण बाप हे बी माहीत नव्हत.. माझ काय चुकल होत र पांडुरंगा जे माझ्या सोबत तू अस केलं माझा संसार मझ विश्व तू एका क्षणात हिरावून घेतल ? ती देवाला नाही तिच्या दैवाला कोसात होती... मी मात्र दुरून एका हतबल झालेल्या जनवरा सारखं हे सगळ पाहत होतो... :::१५ दिवस आधी:::: शनिवार ची रात्र होती सगळी कड काळा कुठ्ट अंधार होता रस्ते पण विरान होते अन् आभाळात पण नी...