कोरोना मुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले एक खरी कहाणी
मला अन् मझ्या ४ महिन्याचा बाळाला भर आयुष्याच्या उन्हात सोडून तो निघून गेला होता, इतका लांब की तो आता कधीच वापस नव्हता येणार..हा विचारच मला अस्वस्थ करत होता...मला आज जगणं म्हणजे काय असत ते उमजलं होत,
मला क्षण भर वाटल व्हत की माझ्या आयुष्याच नंदन वण झाल, मला पदर भरून सगळ भेटल व्हत..पण नशिबात नव्हत..सगळ काई एका सपना सारखं वाटत व्हत एका चिमणी चा खोपा वादळात २ मिनिटात जसा उडून जातो तस मझ बी झाल होत..
( हातात लहान बाळा ला घेऊन त्याच्या गाला वरून हात फिरवत )
"बाळा काय घेऊन आला हायीस र तुझ्या नशिबात तुला बापाचं प्रेम बी नाही मिळालं..."
( तिच्या डोळ्या तून पाण्याचे थेंब बाळाच्या अंगावर पडत होते ) तो निष्पाप जीव टक मक पाहत होता तेला कोण माय अन् कोण बाप हे बी माहीत नव्हत..
माझ काय चुकल होत र पांडुरंगा जे माझ्या सोबत तू अस केलं माझा संसार मझ विश्व तू एका क्षणात हिरावून घेतल ?
ती देवाला नाही तिच्या दैवाला कोसात होती...
मी मात्र दुरून एका हतबल झालेल्या जनवरा सारखं हे सगळ पाहत होतो...
:::१५ दिवस आधी::::
शनिवार ची रात्र होती सगळी कड काळा कुठ्ट अंधार होता
रस्ते पण विरान होते अन् आभाळात पण नीट तारे दिसत नव्हते ..आहे वाटत होते की काही तरी आहे,जे बदलले आहे...काहीतर खूप वायी ट होणार असल्याचे जणू ते संकेत देत होते !
अधून मधून कुठून तरी कुत्रे रडण्याचे आवाज येत होते,
आणि मनात विचारांचे काहूर सोडून जात होते.
रात्री चे ९ वाजत होते ;
मी मात्र नेहमी प्रमाणे चुली समोर बसली होती भाकरी थोपटत..
मी माझ्या कर्तव्याला कधी पाठ नाही फिरवली माझी माय म्हणायची आपले नशीब एक सटवायी येऊन लिहून जाते ,आणि मग आपण मरेपर्यंत त्या नुसार जगत असतो. पण मी म्हणते हे सगळे खोट आहे आज माझ्या बा कड पैसा असला असता तर मी एका श्रीमंत घरात बसले असते,
मला त्यानं महादेवाची पार्वती बनवलं अस्त सोन्या दागिण्या नं शेवटी ज्याच त्याच नशीब हाय, काय करणार जर दैवात नाही तर हातात बी नाही..
पण माझे मालक मला लई पिरम करतात अजून काय हव..
बाई किती वाजले येळ काय झाली कुठ बसल हे दारू ढोसत काय माहित अजून पत्ता नाही
( बाळा कड पाहत पाहत कशी बशी भाजीला फाँडणी टाकत )
ह्या माणसाला जरा बी काळजी न्हाय लेकराची, जरा येळे वर यावे घरी किती बी बोला काही फरक पडत न्हाय ..
तेवढयात दार उघडलं
प्रेमला : अहो अलात का ?
माधव : हो आलो मी ( हात धुत धूत )
प्रेमला : अहो किती उशीर जरा वेळ काळ बघा घरी लहान लेकरू आहे..मला खूप ताण येत आहे सगळे काम करून करून करून मला बी जीव हाय की ..
माधव : आग हो बायी मझे राणी मला खूप वयिट वाटते बग तुला अस रत्रदिवस काम करताना बगून...मला वाटतं की मी काय बी करू शकलो न्हाय पण आता न्हाय...मी अन् तू मिळून ह्या लेकराला एवढं मोठं करू बग, तेला भेटायचं महणल तर आधी तारीख घ्यावी लागलं पाहिजे बग...
प्रेमाला : व्हय व्हय खा आता गुमान म्हणे कलेक्टर बनवणार तुमच्यान साधी बाटली सुटेना अन् मोठं सांगत आला की इथं ..!
माधव : आग तुला सांगायचं ई सरून गेलो बग गावात पारावर माणसे बसले व्हती पोलीस अलते म्हण
प्रेमाला : ( दुर्डीतून भाकर उचलत ) आता ग बाई काई कुन चोरी बिरी केली का काय?
माधव : आग त स न्हाय ते सांगून गेल्यात म्हणे की उद्या पासून सगळ बंद हाय काई बी मिळणार नाही दुकान गडे काम सगळ बंद
दुसऱ्या देशातून आपल्या हिकड कोरो ना आलाय म्हणून अस केलं हाय म्हणून व्हते
प्रमला : कोरो ना काय आहे कोणी चोर हाय का ?
माधव : आग येडे ते आजार हाय म्हण माणसाला १५ दिवसात मारून टाकतो..!
प्रेमाला : हे देवा दारू कमी व्हती आता हे बी आला
माधव : अन् दुसर म्हणजे की हा रोग एका माणसाला झाला की तो दुसऱ्या ५० जनाला करू शकतो..
प्रेमाला : ( जरा हैराण होऊन ) मला तर तुमची काळजी वाटत हाय रोज बाहेर जाता येता कोणी तुम्हाला केला तर कोरो ना मग कसं?
माधव: सध्या तर काई इलाज न्हाय मरण्याशिवय बग म्हणून म्हणतो तू बाहेर निघुस नको कुठ रोजाने नको जाऊ मी हाय की मी करतो काम आपल्याला किती लागतं ४ भाकरी रोज फक्त..! मला कुठं ना कुठं मिळेल रोजगार
प्रेमला : व्हय की पण लेकराच नशीब नग का बनवायला नाहीतर बसल ते बी खडे फोडत तुमच्या सरक..
आज ते जन्मुन ४ महिने झाले तेला अजून कानात काडी न्हाय घातली तेवढ बी पैस न्हाईत आपल्या कड..
माधव : (जेवण आटपून हात धूत ) काई पण नग बोलू तू जेव मी जरा भायिर जाऊन येतूया ...!
प्रेमाला: ऐका जरा लवकर या मला चिंता लागत आहे बरं का ?
माधव ( प्रतिसाद न देताच पायात बुट अडकून ) निघून गेला ..
( पारावर मंडळी बसली आहे कोणी तंबाखू खात खात थुंकत आहे कोणी रेडू वर बातम्या ऐकत आहे )
श्याम : ये मधवा अरे कसा आहेस ओळखल का?
माधव: हा राव कधी आला र बरा हाय का? तुला कसा ई सरल तू माझा शाळेचा मित्र, मंग कशी हाय तब्येत पाणी ?
श्याम : हो अगदी मजेत बग आज च आलो मी तुला माहित आहे ना कोरो ना विषयी शहरात खूप प्रचंड भीती आहे कित्येक लोक मरण पावली आहेत
माधव: अर बास बाब मला उग भीती भीती नको घालस बा?
विजय : अर् माधव हे खरे सांगत हाय राव मझी मुलगी बी सांगत होती की जवळ पास १०० लाख लोक हेच्या मूळ प्राण गमावले हायेत अन् रोज नवीन नवीन मरत हयेत त्यामुळं काळजी घ्यावी लागेल बाबा..
माधव: उद्या सगळ बंद हाय का ?
केशव: हो अताच पोलिस सांगून गेलं की
माधव : अर् पण मला आज पाटल्याच्या हित काम होत धुरा खंदयच हित शेताला पाणी देयाला
केशव : अर् माधवा मझ जरा ऐक माणूस काय जनावर काय कोणी बी वाचणे अवघड हाय तू बाहेर नको जाऊस वैनी ला बी साँग जरा
काम काय नंतर बी कर की
माधव : (जरा उदास होऊन )
पण अर् पैसे नाहीत र माझ्या कड उद्या जवार घ्येयाची व्हती म्हणून मणल ..
केशव : बग बा आता काय सांगू तुला..
( पाटील साहेब येताना )
केशव : बग आल पाटील ई चार तेला च .
पाटील : ( हातात पेन धरत )
नमस्कार तुम्हाला माहीत हाय ना नवीन आजार आला हाय
अन् सरकार न पूर्ण बंद जाहीर केला हाय
त्या मूळ घराच्या बाहेर कुणी पडल की दंड हाय बार का?
केशव : पाटील पण किती दिवस हाय हे बंद?
पाटील : माहीत नाही
माधव: अहो मग आमी काय खायचे जर काम नसल तर ?
पाटील : हे बघा काई दिवस आपल्याला अस वागावे लागेल बंद पाळावा लागेल नाहीतर सगळ गाव संकटात येईल बरं नंतर काई तर तोडगा निघल की.
माधव : (पायात बूट घालून तडा तडा निघून जातो )
कधी येतील हे काय माहित मला तर काई करमत नाही काय काय होणार हाय काय माहित देवा..
तू झोपली न्हाय का ?
दारातूनच माधव ने आवाज दिला
प्रेमाला: न्हाय की तुमच्या शिवाय कशी ...!
माधव : आग लयी च मोठा आहे कोरो ना ते रे डू घे बरं जरा बातम्या लाव
प्रेमाला : ( बाजे खालीची रेडिओ उचलत ) घ्या
माधव : आपली चूक झाली बग ( प्रेमला कड पाहत पाहत )
आपण लागणारे समान तरी आणून ठेवायला पाहिजे व्हते ..
प्रेमाला : हा पण पैसे बी नव्हते की कुठून अन् कसं आणणार व्हता?
माधव : उद्या बघतो जर कोणी दिले तर श्याम आलं आहे पुण्यावरून ते देईल पैसे थोडे फार मी त्याला लहान पानी खूप मदत केली होती बग
प्रेमाला : नका मला नाही आवडणार तुमि कुणाला बी पैस मागितलेले आपल्याला बी हक्क हाय माना न जगायचं
माधव: ( तिच्या डोळ्यात बगत बगत )
राणी तुझ सगळ खर आहे मी दुसरा मार्ग बी नाही की ?
(पहाटेचे २ वाजत होते अजून हे बोलत च होते अशे वाटत होते की गरिबी मूळ त्यांची झोप उडाली आहे )
लेकरू मात्र शांत झोपी गेले होते त्याला जणू सगळे कळून चुकले होते पण त्याच्या हाती काही नव्हते...फक्त पाहण्या शिवाय ...
( सकाळी सकाळी गावात धावपळ सुरू होती सगळे जन आपले आपले घर दार बंद करून अतून पाहत होते )
अंबुलान्स च्य आवाजाने सगळे गाव दणाणून निघाले होते
म्हणून माधव तसाच उठून चुळ भरून गावात निघाला
ती सगळी गर्दी आवाज एका च दिशेनं येत होता
त्याला काही समजत नवत काय आहे ते
वाटत काटे टोचत व्हते तरी तो चालत राहिला
केशव : अर् नको जाऊ तिकड
माधव : अर् काय झालं ते तर सांग
माधव : पुढे चालत गेला
( अन् त्याने जे पाहिलं तेंव्हा त्याच्या पाया खालची जमीन सरकून गेली )
काय बोलू काय करू त्याला सुचेना
तो जाग्या वर बसला आणि डोळे झाकून २ मिनिटे त्याने स्वतःला त्या परिस्थतीशी जोडून पहिले
त्याने डोळे उघडले अन् पळत सुटला आधी घरी आला दार खिडक्या लाऊन सगळे बंद करून देवा पुढे नतमस्तक झाला
माधव : देवा का र अस केलं तू?
प्रेमाला : काय हो कुट गेलं तासा सकाळी सकाळी
माधव : अह तो काल आलेला श्याम मरण पावला सकाळी
प्रेमाला : काय ?
माधव : ते काय आवाज येईना का तुला
प्रेमाला : थक्क होऊन आग बाई पण कल च तर नीट व्हता की तुम्ही तेला भेटला बी ..
माधव : हा पण सकाळी आवाज आला म्हणून मी गेलो बघायला
( बाहेर स्पीकर वर कोणी तर बोलत होते )
कृपया आपल्या गावात शहरातून आलेला पहिला बळी ठरला आहे कोरो ना चा जे जे ह्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर दबाखण्यात जाऊन तपासणी करून घावी ..
माधव : ( अंगाला गाम सुटला होता मनात कुठे तर भीती वाटत होती )
प्रेमाला : काय बी होणार न्हाय बगा मझा देव हाय मझ्या अन् आपल्या सगळ्या चे पाठी
उठा आता अंघोळ करून घ्या जा बर
माधव : ( त्याला काहीच बोलले ले ऐकू येत नव्हते )
एकदम खचून गेला होता ...३ मिनिटं मध्ये त्याला सगळ सँपल अस वाटत व्हत..
प्रेमाला : आव उठा की आता ...!
माधव : ( स्वतःला जरा सावरत )
लुंगी अन् फाटकी टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये जात जात तो बोलला :::
तू माझी काळजी करते ना मग मला काय बी होणार न्हाय बग...
प्रेमाला : ह आता कसं. या लवकर मी जेवण बनवते गरम गरम ....
( त्या प्रेम वेडी ला थोड बी उमजल नव्हत तिचं नशीब काय घेऊन येणार आहे ते येणाऱ्या काही तासात तिचं आयुष तिचं कुंकू तिचं सौभाग्य सगळ संपून जाणार होते...तिचा देवावर विश्वास होता म्हणून ती खुश होती )
आज तिने नकळत पण माहीत नाही माधव चे आवडते जेवण म्हणजे भरलेलं वांग आणि भाकरी बनवल्या होत्या
जशे काही तिला जांन होती ह्या सगळ्या गोष्टींची पण ती सांगत नव्हती ...
माधव:( देव पूजा करून फुल देवाला वाहत आहेत )
आग दिवा विजला बग देव घरतला (माधव जोरात बोलले )
अचानक वारे सुटले होते ह्या आधी तर नव्हते वारे ना आभाळ आले होते तरी हे सगळे होत होते ...
प्रेमाला : आ व वारं सुटलं आहे दिवा कसा राहील बर
माधव: ( माधव च्या मनात पाल चुकचुकली होती )
आग आयिक की असा दिवा अचानक वीजला***
तुमि या बर लवकर तिने माधव चे बोलणे मध्येच थांबले अन् माधव मनात तशे च ठेऊन जेवायला बसला
जेवण खूप चवदार होते म्हणून हृदय भरून तिची तारीफ करू लागला
तिकडे पाळण्यात लेकरू अचानक रडायला लागले होते
तिने थोड्या वेळा पूर्वीच त्याला पाजले होते आणि नेहमी तो ह्या वेळी झोपत असे
पण आज ती जागा होता आणि काही तर सांगण्याचा प्रयत्न करत होता
पण मी आणि ते दोघं बी एवढे हुशार नव्हतो की त्या चिमुरड्या ची भाषा समजू शकू ...
जेवण झाले तशे दारावर कुणी तरी १० बरा लोक असतील असा आवाज आला
"कोणी आहे का घरात ?
कृपया उत्तर द्या '
प्रेमला तर घाबरून गेली
माधव ताडकन उठला अन् दाराला गेला तिथं केशव पाहून त्याला जरा जीवात जीव आला
केशव: माधव तू मझ्या सोबत चल आधी...
माधव: अर् पण कुठं ( शेजारी पोलिस गाडी आणि एक डॉक्टर चा ताफा होता ..
प्रेमाला :( लेकराला घेऊन पळत पळत दारावर आली )
आव काय हाय हे केशव भाऊजी काय झालं सांगता का ?
केशव: आव वहिनी तुमी भाऊ पासून दूर होता ना काल पासून आणि लेकरू पण ?
प्रेमाला : हो की
केशव : मग सगळे ठीक हाय
माधव : ( कसा बसा पटकन आला अगदी रडकोंडीला आला होता)
अरे केशव हे काय हाय र?
केशव : अर् काल जे श्याम सोबत झाल त्याच्या घरच्या आज ३ लोक परत दवाखान्यात गेले आहेत त्यांना त्रास सुरू झाला
प्रेमाला : मला तर काय बी कळणा बगा
केशव : आव वायनी आणि माधव भाऊ ऐका आज डॉक्टर आपल्या गावात आले आहेत प्रत्येक जणांना चेक करायला
कारण हा आजार एका पासून दुसऱ्या ला होऊ शकतो म्हणून..
प्रेमाला : बरं मग आमचे ह्यांना बी का चेक केलं?
केशव : कारण ते काल श्याम भाऊ जवळ बसले होते बोलत म्हणून
मला बी चेक केलं आहे
माधव: आता बर मी जाऊ का आत मला जरा कासावीस होत आहे
केशव : आव टेन्शन नका घेऊ राव...
(तेवढ्यात सिस्टर चा आवाज : ऐका आपण आज जेवढे नमुने तपासले त्या पैकी ३ जणांना ह्या रोगाचं लागण झाली आहे कृपया लक्षा द्या )
सगळे जण शांत ते ३ नाव ऐकायला सगळे आतुरली होती आज पहिल्यांदा च अस झाल होत की मझ नको नाव ह्या यादी मध्ये...
एरवी लोक नाव येण्यासाठी पार काय भी करत होते ..
(कृपया नीट ऐका )
मी ज्यांचे ज्यांचे नाव सांगते त्यांनीं माझ्या सोबत आजाच
द वा खा ण्यात यायचे आहे
१.माधव
२.केशव
३ शिवकांता बाई
बस सगळे वादळ निऊन गेले जे उरात पेटले होते ते आता थंड झाले .....
माधव : जरा बायको कड पाहत पाहत बघितलं बा तुझ्या देवा न मला नाही वाचवलं ( मनामध्ये बोलत होता)
प्रमाला : न्हाय हे कसं ,बास मला काई ऐकायचं नाही
डॉक्टर तुमि अजून एक येळेस नीट पाहा नाव
सिस्टर: बाई तुम्ही घरात जा तुमच्या हातात लहान लेकरू आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आता मन खंबीर कारा ...बाकी सगळ देवाच्या हातात...
ती काय काय बोलली हे प्रेमाला ला समजलेच नाही ती एका वेड्या सारखी सगळी कड पाहत राहिली विनवण्या करू लागली पण तिचा नाईलाज होता ...
माधव : राणी मला माफ कर ग मी तुला साथ नाही देऊ शकलो बग ( डोळ्यातून टाप टाप थेंब येत होते )
प्रेमाला : धनी काय म्हाग अन् पुढं नकास पाहू तुमि धीर नका सोडू ..
सिस्टर : चला वेळ होत आहे
माधव : एका थैलित आपले २-३ कपडे घालत मनात बोलत होता जिच्या साठी आयुष वेचल आज तिला सोडून जात आहे माहीत नाही वापस येईल की नाही ..
ज्या थैलीत मी ह्या जगात आलो आज तीच थैली मला घेऊन जात आहे
सगळ्या घरात एक शेवट ची नजर फिरवत आणि रडत असलेली बायको हातात एक लहान बाळ हे त्याला काळजात टोचत होते...
तसच निष्ठुर होऊन दारच्या दिशेने निघाला ::::
तिला राहवलं नाही
तिने लेक्रसारखा हंबरडा फोडला
धनी धनी आव मला बोलून तर जा, माजा जीव हायिस व तुमि मला अस टाकून नका जाऊ मझ कोण हाय तुमच्या शिवाय ....
पण माधव आता ह्या सगळ्या गोष्टी पासून दूर झाला होता त्याला ह्यात च तिचे अन् लेकराचे भले दिसत होते त्याला अता दरा पूड उभी असलेली पांढरी गाडी दिसत होती तो तड तड चालत गेला मागे एकदा बी त्याने पाहिले नाही
त्याला माहित होते तो अशे का वागत आहे ते कारण त्याला ही लढाई जिंकायची होती अन् तिचे डोळे त्याला कमजोर बनवत होते म्हणून तो तसचं निघून गेला आणि पाहत पाहत दारा पुढची गर्दी हवेत विरघळून गेली....
संध्याकाळ झाली ही संध्याकाळ बाकीच्या संध्याकाळी पेक्षा वेगळी होती जशी ती दुश्मन होती..
तिच्या म्हाताऱ्या माई ला खबर मिळाली म्हणून ती थोड्या वेळापूर्वी आली होती
माय: आग बाई लेकराची टाळू किती वाळून गेली ग तू माय हाय की कोणी दुसरी बाई हाय ?
प्रेमाला : शांत डोळे झाकून पडून होती
माय : ये पोरी आग म्या तुला बोलते की कुणाला?
प्रेमाला : माय ते घे बर बाटलीत हाय तेल थोड अन् माक तूच टाळू मला काय बी बोलू नगस
माय : बार ग बाई
( आज पहिल्यांदा घरची चूल नव्हती पेटली तिच्या मनात खूप काही येत व्हते कुठे तरी अशा होती पांडुरंगा वर म्हणून ती त्या खोटे अशे पोटी जिवंत होती...)
आज तिला ना भूक लागली होती ना तहान लेकरू पण उपाशीच होते...
::::५ दिवसा नंतर ::::
शीवकांता बाई सुखरूप घरी आल्या आणि परत आपल्या कामाला लागल्या त्यांच्या अहवाल नेगटिव आला..
:::::दुसऱ्या दिवशी :::::
केशव पण घरी आला,
डॉक्टर्स ने त्याला थोडे दिवस एकटे राहायला सांगितले होते कारण त्याचा रिपोर्ट आधी पोजी टिव होता पण नंतर नीट झाला पण थोडी सर्दी होती च जी मटणाचा रस्सा वडल्यावर जाणारी होती....
पण माधव चे काय झाले हे कुणालाच माहीत नव्हते
(प्रेमला तर वेडी आस लावून बसली होती अचानक ते येतील अन् मला आवाज देतील मी आलो म्हणून ...
ती सारखीच दरवाजा कड पाहत होती दिवस असो की रात्र तिला काही भान नव्हते
तिला सगळीकड माधव दिसत होता ....)
माय: आग बर मी निघते बाई आता मला बी घरी म्हातारं हाय बीचार त्याला रात्री दिसत न्हाय
अन् जरा पोटाला खा बर माय...बाई..
अन् लेकारा ला बी येळेला पाजत जा...आव
प्रेमाला: माय रहाय की अजून २ -३ दिवस मला कसं तरी वाटत हाय बग हे रिकाम घर मला मला मारून टाकील बग..
माय: अग येडे तू जर अस केलं तर ह्या लेकराची हाल व्हतील नव..म्या परत येते बाई
( आता मात्र एकदम सन्नाटा होता एक एक क्षण तिला जीव घेणारा वाटत होता ..)
गावातली लाई ट गेली होती ...जोराची हवा सुटली होती.. ५ मिनिटात आभाळ भरून आले आणि विजाचा कडकडाट सुरू झाला ...
प्रेमला : माय घरी पोचली असेल की नाही हा विचार आणि नवरा कसा असेल हा विचार सारखं तिला मारून टाकल्या गत करत होते...
पाऊस सुरू झाला खूप जोरात आणि वादळ पण होते आज लेकरू रडत नव्हते हीचे तिला नवल वाटत होते
काल काही नसताना ते रडत होते आणि आज ते हसत होते...खेळत होते पत्रातून पावसाचे २-३ थेंब त्याच्या अंगावर पडत होते...जणू ते नवीन चाहूल आहे अशे त्या लेकराला सांगत होते..
असेच दिव्याकड पाहत पाहत आणि लेकराला कुशीत घेऊन ती झोपी गेली....
( सकाळ झाली सगळीकड कचरा आणि धूळ )
ती लवकर उठली होती जोमाने कामाला सुरुवात तिने केली होती ...तिने स्वप्नात काय पहिले असेल पण ती बदलली होती...मला वाटतं की तिने लेकरासाठी स्वतःला बदलून घेतले होते...
तिने झाडू उचलला
अन् अंगणात गेली ( लेकरू पाळण्यात मोठ्याने खेळत हसत होत ) त्याच्या आवाजाला प्रतिसाद देत ती अंगण झाडत होती
तिला एक नवीन तुळसी चे रोपटे अंगणात दिसले जे काल
पर्यंत नव्हते ....
तिने आधी झाडू बाजुला टाकला अन् त्या रोपाला तिने निरखून पाहिले क्षण भर तिला माधव चा चेहरा त्यात दिसला
म्हणून ती उद्विग्न झाली अन् तिथेच बसून राहिली...
:::::१० दिवसानंतर ::::
कुणालाच माहीत नव्हते की माधव चे काय झाले ..
खर तर हे होत की,
"माधव ४ दिवसा पूर्वीच" ह्या जगाला सोडून गेले होते..! आणि त्यांनी जाता जाता तिथल्या डॉक्टर्स ला सांगितले होते की तिला हे नका सांगू ती खचून जाईल....मी तर अभागी आहे सगळे असून बी मला उपभोगत आले नाही...मला तिची माफी मागायची आहे तिच्या डोळ्यात मला एकदा पाहायचे आहे .मझ्या लेकराला भविष्य द्या. डॉक्टर्स :::::बोलत बोलत त्याने प्राण सोडले त्याला व्हेंटिलेटर वर ठेवले होते कारण त्याची तबीयत अचानक बिघडली होती जेंव्हा त्याला कळले की तो पोजि टिव आहे...
कदाचित त्याला कोरो ना पेक्षा आधी हार्ट अटॅक आला असावा ...
आणि म्हणून च मी सरकार तर्फे काही मदत घेऊन तिच्या घरी आलो होतो...जेंव्हा मला ही सगळी कहाणी ती सांगत होती तेंव्हा मला राहवले नाही...
ती सांगत गेली मी लिहीत गेलो आणि हे शेवटीं एका वहीत त्यांची अमर कहाणी कायमची बंद झाली.... जे त्यांचा मुलगा मोठा झाल्यावर मी त्याला हे वही देईल…..
धन्यवाद मित्रांनो...
Comments
Post a Comment